कॅपिटल/स्टॉक/शेअर मार्केट
कॅपिटल मार्केट म्हणजे नक्की काय? जेंव्हा एखाद्या कंपनी ला खूप मोठ्या भांडवलाची गरज असते तेंव्हा ती कंपनी स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट आपल्या भाग भांडवलाचा काही हिस्सा लोकांना विकून पैसे जमा करते. अशा मार्केट ला कॅपिटल मार्केट म्हणले जाते. तसेच इथे बॉण्ड्स, डिबेंचर्स विकून ही मोठ्या कंपन्या भांडवल जमा करतात आणि आपली भांडवली खर्च(Capex) गरज भागवतात. भारतामध्ये दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. 1. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 2. नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोन्ही एक्सचेंज मुंबई मध्ये स्थित आहेत आणि BSE वर 5000 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत आणि NSE वर 2000 च्या जवळपास कंपन्या लिस्टेड आहेत. येथे दररोज 60 लाख कोटी पेक्षा जास्त चा व्यवहार केला जातो आणि जागतिक क्रमवारीत NSE पहिल्या 10 स्टॉक एक्सचेंज मध्ये आहे. जर एवढा मोठा व्यवहार इथे होत असेल आणि आपणास त्याबद्दल काहीच माहिती नसेल तर आपण नक्कीच या साइटवर स्टॉक मार्केट बद्दल संपूर्ण माहिती मिळवून गुंतवणूक आणि ट्रेडिंग करु शकता. सर्वप्रथम आपणास डिमॅट अकाउंट काढावे लागेल. त्यासाठी आपल्याकडे खालील गोष्टींची आवश्यकता आहे. 1. पॅन कार्ड 2. आधार का...