वॉरेन बफे यांचे पत्र
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी वॉरेन बफे यांचे 'हे' पत्र वाचा आजकाल शेअर बाजार (Share Market) तेजीत आहे. बाजारात गुंतवणूकदारांची आवड वाढली आहे. तरुण महिला गुंतवणूकदारांचा सहभाग देखील वाढला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल तर जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि त्यांनी लिहिलेले बर्कशायर हॅथवे इंक (Berkshire Hathaway Inc) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे (Warren Buffett) यांचे हे वार्षिक पत्र उपयोगी ठरू शकते. शनिवारी 90 वर्षीय वॉरेन बफे यांनी आपल्या कंपनीच्या भागधारक बर्कशायर हॅथवे यांना एक पत्र लिहिले. यात त्यांनी आपल्या चुकांचा उल्लेख केला. तसेच गुंतवणूकदारांना सूचनाही दिल्या आहेत. वॉरेन बफेच्या मोठ्या चुका जाणून घ्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रात, ते पीसीसीबद्दल किती चुकीचे होते, त्यांचे निर्णय कसे चुकले यावर प्रकाश टाकण्यात आला. 2016 मध्ये, बर्कशायर हॅथवेने एयरक्राफ्ट आणि इंडस्ट्रियल पार्ट बनविणारी कंपनी प्रिसिजन कास्टपार्ट्स कॉर्पोरेशन, पीसीसी (Precision Castparts Corp-PCC) विकत घेतली. पीसीसीला 2016 मध्ये 32.1 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी क...