IPO म्हणजे काय?
IPO म्हणजे काय?
आज भारतात कितीतरी पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत, अशा कंपन्यांचे शेअर्स हे खाजगीरित्या विविध लोकांकडे आहेत आणि जाहीरपणे त्याची खरेदी-विक्री होत नाही.
अशा जर कंपन्या शेअर बाजारामध्ये लिस्ट झाल्या तर या लिस्टिंगच्या प्रक्रियेसाठी पहिली प्रक्रिया असते ती म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफेरींग (IPO ).
म्हणजेच ज्या कंपन्याचे शेअर्स स्टॉक मार्केट वर खरेदी विक्री साठी लिस्टिंग करण्यात येतात त्या प्रक्रियेस Initial Public Offer म्हणतात.
या वर्षी मार्च मध्ये आलेला SBI कार्ड कंपनीचा IPO ही शेअर्स मार्केट मध्ये लिस्ट करण्यासाठी आणलेला IPO होय. आज आपण IPO म्हणजे नक्की काय आणि IPO मध्ये शेअर्स घेण्याचा निर्णय घेण्या आधी कोणती पडताळणी करावी ते पाहूया.
यशस्वी उद्योजकाला त्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी भांडवलाची गरज असते आणि म्हणून तो वेळोवेळी कर्ज काढून, भागीदार जोडून किंवा मार्केटमध्ये शेअर्स विकून व्यवसायासाठी भांडवल उभं करत असतो. आज जागतिक स्तरावर असणाऱ्या कोणत्याही कंपन्या बघा, त्यांच्या उत्पादन आणि सेवांच्या बळावर जगावर अधिराज्य गाजवत आहेत. पण यामध्ये सर्वात मोठा वाटा अशा असंख्य हातांचा आहे. ज्यांनी या कंपन्या लहान होत्या, तेव्हा त्यांच्यावर विश्वास दाखवून त्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे असंख्य छोटे छोटे सामान्य गुंतवणूकदार. सरळ शब्दात IPO म्हणजे एखाद्या उद्योजक समूहाने त्यांच्याकडे असलेल्या उद्योगाचे मोठ्या स्तरावर नेण्यासाठी लागणारी भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी बाजारातून भांडवल उभारणी होय.
कोणत्याही कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी पाहायच्या ते आपण पाहूया ;-
१. कंपनीची प्राथमिक माहिती
२. कंपनीचे मालक (प्रमोटर्स/डायरेक्टर्स) कोण आहेत ? त्यांचे व्हिजन, हिस्ट्री इत्यादी.
३. कंपनीची उत्पादने/सेवा कोणत्या ?
४. कंपनीच्या उत्पादने/सेवा यांचे भविष्य उज्ज्वल दिसतंय का ?
५. कंपनी देत असलेल्या उत्पादने/सेवा एक व्यवसाय म्हणून तुम्हाला कळतंय का ?
६. कंपनीची गेल्या ५ वर्षांतील कामगिरी कशी आहे ?
७. कंपनीवर काही कर्जे आहेत का? आणि कंपनीच्या पूर्ण संपत्तीपेक्षा ती जास्त आहेत की कमी आहेत ?
८. कंपनीच्या इतर आर्थिक बाबी कशा आहेत ?
९. कंपनीच्या IPO बद्दल माहिती
१०. इश्यूची साईज केवढी आहे? कंपनीला भांडवल किती जमा करायचे आहे ?
११. ऑफर भाव योग्य आहे की नाही ?
१२. इश्यू आणण्याचा हेतू काय ?
१३. इश्यूनंतर पब्लिककडे किती शेअर्स असतील आणि प्रमोटर्सकडे किती शेअर्स असतील.
स्वतः अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही IPO मध्ये शेअर्स घेण्याची घाई करू नका. कंपनी चा DHRP वाचलेलं चांगले राहील.
टिप्पण्या