एका उंदराची गोष्ट
एका उंदराची गोष्ट।
=============================
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
=============================
धान्याने भरलेल्या एका बरणीत एक उंदीर सोडला. उंदराला खूप आनंद झाला एवढं सगळं आयतं आणि विणाकष्ट मिळालेलं अन्नधान्य पाहून. आता त्याला पोटासाठी इतरत्र भटकत फिरायची गरज राहिली नव्हती आणि तो एकदम खुश होता.
थोडे दिवस उंदराने खूप मजा केली पण तो आता बरणीच्या तळाशी पोहचला होता आणि बरणीत अडकून पडला होता. आता त्याचं सगळं जीवन कोणीतरी टाकलेल्या दाण्यावर पूर्णपणे अवलंबून होतं. त्याच्या आवडीचं धान्य मिळत नव्हतं की तो ते मिळवण्यासाठी काहीच करूही शकत नव्हता. त्याला जगायचं असेल तर त्याला कोणी काहीही टाकलेलं काहीतरी खावं लागत होतं.
गोष्ट संपली.
सरकारच्या मदतीवर किंवा एकाच उत्पन्नावर
एवढं ही अवलंबून राहू नका की ती मदत आपल्यासाठी धान्याची बरणी होवू नये. स्वतंत्र आणि खुशाल जगण्यासाठी स्वतःचे कौशल्ये विकसित करा आणि आपले उत्पन्नाचे मार्ग वाढवा अथवा बरणीतला उंदीर व्हायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
टिप्पण्या