व्याज आणि वेळ
।।व्याज आणि वेळ।। उत्पादनाच्या चार घटकांपैकी भांडवलावरील मिळणारा परतावा म्हणजे व्याज. भांडवल हे उत्पादन वाढीत साह्यभूत मानवनिर्मित घटक होय म्हणजे आपण कर्ज घेऊन एखादा उद्योग चालू केला आणि आपलं उत्पादन खरंच वाढलं तर व्याज द्यायला काहीच हरकत नाही. फक्त एक रुपया व्याज देण्यासाठी आपणास दोन रुपये कमवावे लागतील त्यालाच आजच्या बँकिंग भाषेत DSCR म्हणजेच डेट सर्विस कव्हरेज रेशो म्हणतात. तो कमीतकमी 1.75 असावा. पण कर्ज घेऊन उत्पादनात वाढ होत नसेल आणि आपणास चक्रवाढ दराने परतफेड करावी लागत असेल तर? "Compound interest is the 8th wonder of the world. He who understands it, earns it; he who doesn't, pays it.” -Einstein. खरंतर कर्ज दोन प्रकारचे असते. 1. उत्पादक कर्ज. - ज्या मुळे उत्पादनात वाढ होते आणि अशा कर्जावर दिलेलं व्याज वाढलेल्या उत्पादनातून दिलं जातं त्यामुळे हे कर्ज वयक्तिक स्तरावर परवडणारे आहे. 2. अनुत्पादक कर्ज.- अशा प्रकारच्या कर्जामधून उत्पादनात कसलीही भर पडत नाही पण आकस्मिक गरजेपोटी हे कर्ज घेतले जाते. पण सध्या Consumer Loans/Personal Loans मोठ्या प्रमाणात घेण्याचा ट्रेंड आहे आणि...