व्याज आणि वेळ
।।व्याज आणि वेळ।।
उत्पादनाच्या चार घटकांपैकी भांडवलावरील मिळणारा परतावा म्हणजे व्याज. भांडवल हे उत्पादन वाढीत साह्यभूत मानवनिर्मित घटक होय म्हणजे आपण कर्ज घेऊन एखादा उद्योग चालू केला आणि आपलं उत्पादन खरंच वाढलं तर व्याज द्यायला काहीच हरकत नाही. फक्त एक रुपया व्याज देण्यासाठी आपणास दोन रुपये कमवावे लागतील त्यालाच आजच्या बँकिंग भाषेत DSCR म्हणजेच डेट सर्विस कव्हरेज रेशो म्हणतात. तो कमीतकमी 1.75 असावा.
पण कर्ज घेऊन उत्पादनात वाढ होत नसेल आणि आपणास चक्रवाढ दराने परतफेड करावी लागत असेल तर?
"Compound interest is the 8th wonder of the world. He who understands it, earns it; he who doesn't, pays it.” -Einstein.
खरंतर कर्ज दोन प्रकारचे असते.
1. उत्पादक कर्ज. - ज्या मुळे उत्पादनात वाढ होते आणि अशा कर्जावर दिलेलं व्याज वाढलेल्या उत्पादनातून दिलं जातं त्यामुळे हे कर्ज वयक्तिक स्तरावर परवडणारे आहे.
2. अनुत्पादक कर्ज.- अशा प्रकारच्या कर्जामधून उत्पादनात कसलीही भर पडत नाही पण आकस्मिक गरजेपोटी हे कर्ज घेतले जाते. पण सध्या Consumer Loans/Personal Loans मोठ्या प्रमाणात घेण्याचा ट्रेंड आहे आणि त्यामधून नविन उत्पादक असेट ही तयार होत नाही तसेच व्याजदर ही खूपच जास्त असतो. अशा प्रकारच्या कर्जे वयक्तिक स्तरावर टाळलेलं बरं.
Macro Economics च्या दृष्टीने दोन्ही कर्जे तेवढीच महत्वाची आहेत. उत्पादक कर्जामधून उत्पादकता वाढते तर consumer लोन मुळे वाढलेल्या उत्पादनास मागणी मिळते.
पण थोडं डीप मध्ये विचार केल्यास एक निरीक्षण दिसून येते.
उत्पादक कर्ज घेणारा उद्योजक वर्ग आणि अनुत्पादक कर्ज घेणारा उपभोगता वर्ग. उद्योजकाकडे बिजनेस वाढीसाठी पैसे नाहीत म्हणून तो कर्ज घेतो आणि येणाऱ्या 5-7 वर्षाच्या काळात तो परतफेड करतो. म्हणजे 5-7 वर्षे अगोदर पैसे घेतले म्हणून त्या 5-7 वर्षाचं टाइम व्हॅल्यू उद्योजक व्याजाच्या रूपाने देतो. उद्योजक त्याचा बिजनेस वाढवतो आणि घेतलेल्या कर्जामधून नविन असेट तयार करतो, वाढलेली मागणी पूर्ण करतो आणि नफा कमावतो.
आणि उपभोगता वर्ग जे conumer लोन घेतात त्यांच्याकडे सुरुवातीला पूर्ण पैसे नसतात म्हणून EMI वर वस्तू घेतात आणि पुढील 5-7 वर्षात ते परतफेड करतात आणि त्या 5-7 वर्षांचं टाइम व्हॅल्यू व्याजाच्या रूपाने देतात.
दोन्ही प्रकारच्या कर्जमध्ये वेळेचं मूल्य दिलेलं दिसतं
म्हणजे व्याज म्हणजे वेळेचं मूल्य आणि दिलेल्या कर्जाच्या असुरक्षिततेची कॉस्ट असते.
जर व्याज वेळेचं मूल्य असेल तर आपला किती मूल्यवान आहे. पूर्ण बँकिंग/मनी मार्केट हे व्याजावर चालतात.
या वरून आपणास कोणती कर्जे घ्यावीत कोणते घेऊ नयेत हे समजेल तसेच कोणतेही कर्ज घेत असताना त्यामधून किती फायदा/तोटा होत आहे याचा विचार करणे संयुक्तिक ठरते.
टिप्पण्या