श्रीमंत होण्यासाठी किती पैसे हवेत।
श्रीमंत होण्यासाठी मला किती पैसे हवेत? ============================= मित्रांनो, आपल्या सर्वांना श्रीमंत व्हायचं आहे, पण तुम्ही कधी स्वतःला एक प्रश्ण विचारलाय का? नेमके किती पैसे मिळाले म्हणजे मी श्रीमंत झालो आहे, असे मला वाटेल? श्रीमंत असणं, म्हणजे नक्की काय? आपल्या बॅंक बॅलन्समध्ये, इक्विटी पोर्ट फोलिओमध्ये किंवा म्युचल फंड अकाउंट ला नेमकी किती रक्कम असावी म्हणजे आपण स्वतःला श्रीमंत असं जाहीर करु? प्रत्येकाच्या श्रीमंत असण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात, जसं की कोणी म्हणतं, की वस्तु खरेदी करण्या आधी प्राईस टॅग बघण्याची गरज नसणं, म्हणजे खरी श्रीमंती! कोणी म्हणेल, हवं तेव्हा हवी तेवढी शॉपींग करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे श्रीमंती! कोणी सांगेल, हॉटेलात मेनुकार्ड वरच्या किंमती न बघता, मनमुराद ऑर्डर देता यावी, त्याला म्हणावं श्रीमंती! कोणाच्या म्हणण्यानुसार, आयुष्यात मन मानेल तसं जगणं, हुंदडणं, मनसोक्त फिरणं, खाणंपिणं आणि मजा करणं, ह्याला म्हणावं श्रीमंती! बेदम पैसा, अफाट संपत्ती, मनसोक्त स्वातंत्र्य आणि रोज भराभर...