श्रीमंत होण्यासाठी किती पैसे हवेत।
श्रीमंत होण्यासाठी मला किती पैसे हवेत?
=============================
मित्रांनो,
आपल्या सर्वांना श्रीमंत व्हायचं आहे,
पण तुम्ही कधी स्वतःला एक प्रश्ण विचारलाय का?
नेमके किती पैसे मिळाले म्हणजे मी श्रीमंत झालो आहे, असे मला वाटेल?
श्रीमंत असणं, म्हणजे नक्की काय?
आपल्या बॅंक बॅलन्समध्ये, इक्विटी पोर्ट फोलिओमध्ये किंवा म्युचल फंड अकाउंट ला नेमकी किती रक्कम असावी म्हणजे आपण स्वतःला श्रीमंत असं जाहीर करु?
प्रत्येकाच्या श्रीमंत असण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात,
जसं की कोणी म्हणतं, की वस्तु खरेदी करण्या आधी प्राईस टॅग बघण्याची गरज नसणं, म्हणजे खरी श्रीमंती!
कोणी म्हणेल, हवं तेव्हा हवी तेवढी शॉपींग करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे श्रीमंती!
कोणी सांगेल, हॉटेलात मेनुकार्ड वरच्या किंमती न बघता, मनमुराद ऑर्डर देता यावी, त्याला म्हणावं श्रीमंती!
कोणाच्या म्हणण्यानुसार, आयुष्यात मन मानेल तसं जगणं, हुंदडणं, मनसोक्त फिरणं, खाणंपिणं आणि मजा करणं, ह्याला म्हणावं श्रीमंती!
बेदम पैसा, अफाट संपत्ती, मनसोक्त स्वातंत्र्य आणि रोज भराभरा वाढणारी संपत्ती, ह्या सगळ्या श्रीमंतीच्याच व्याख्या आहेत,
ह्या सगळ्या व्याख्यांमध्ये दम आहे, पण तरीही वरील सर्वच व्याख्या अपुर्ण आहेत,
नेमके किती पैसे मिळवले म्हणजे मी श्रीमंत झालो, ह्या प्रश्णाने मलाही भरपुर छळले,
मी स्वतःला नक्की कधी श्रीमंत समजेन, ह्या विचारांमध्ये मी माझ्या शेकडो रात्री खराब केल्या,
आणि बऱ्याच विचार मंथनानंतर ‘श्रीमंत कोणाला म्हणावे?’ ह्या जटील प्रश्णाचे, मला एकदाचे उत्तर सापडले,
ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला हा साक्षात्कार झाला की,
“श्रीमंत माणुस तोच ज्याला चिंता नसते, ज्याला आर्थिक विवंचना नसतात.”
मन मानेल तसे पैसे उधळेल, तो श्रीमंत नाही, त्या उधळपट्टी करणारा असे म्हणता येईल,
मग खरा श्रीमंत म्हणावे तरी कोणाला?
“ज्याला पैसे कमवण्याची चिंता नसते, तो असतो खरा श्रीमंत!...”
“पैशाच्या बाबतीत जो टेंशन फ्री असतो, तोच खरा श्रीमंत!”
इच्छा असो वा नसो, ज्याला कामावर जावेच लागते, तो श्रीमंत नाही,
जो स्वतःच्या मर्जीने आवडीचे काम करण्यात आयुष्य सत्कारणी लावतो, तोच खरा श्रीमंत!
आज तुम्हाला सर्वांना श्रीमंत होण्यासाठीची एक रक्कम मनोमन ठरवुन टाकायची आहे.
समजा,
घर चालवण्याचा आणि मनसोक्तपणे जीवन जगण्याचा तुमचा महिन्याचा खर्च आहे, पन्नास हजार रुपये!
तर श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला आवश्यक रक्कम आहे, पन्नास लाख रुपये!
वार्षिक बारा टक्के उत्पन्न देतील अशा कोणत्याही माध्यमात तुम्ही ही रक्कम गुंतवलीत, तर तुमची महिन्याच्या खर्चाची विवंचना संपली,
थोडं डोकं चालवुन वर्षाला बारा टक्के रिटर्न देणाऱ्या स्किम्स शोधुन काढाव्या लागतील,
एफ डी तुम्हाला चार पाच टक्के रिटर्न देईल,
पाच दहा वर्षांपेक्षा जास्त काळाचा विचार कराल तर गोल्ड किंवा इंडेक्स फंड तुम्हाला बारा ते पंधरा टक्क्यांपेक्षा जास्तच रिटर्न देतील.
खोटं वाटत असेल तर मागच्या वीस वर्षांचा अभ्यास करा.
-----------------------------------------------
कोणतेही ध्येय जितके स्पष्ट असते, नेमके असते, असे ध्येय साध्य करण्याची शक्यता वाढते,
म्हणुन आजच तुम्हाला श्रीमंत असण्याची रक्कम निश्चित करुन टाका,
आणि ते पैसे तुम्हाला ऑलरेडी मिळालेले आहेत, अशी सकाळ संध्याकाळ मनापासुन कल्पना करा,
हे ब्र्म्हांड आणि हे शेअर मार्केट तुम्हाला इच्छित रक्कम मिळवुन देण्यासाठी सहाय्य करेल, ह्यावर सुद्धा मनापासुन विश्वास ठेवा,
आणि आपोआप तुम्हाला असा अनुभव येईल की, संपत्तीला तुम्ही आकर्षित करुन घेत आहात!
आपल्याला नेमकं काय पाहिजे, किती पाहिजे आणि कधी पर्यंत पाहिजे, ह्या प्रश्णांची क्रिस्टल क्लिअर उत्तरं आपल्याला हवी ती रक्कम मिळवायला, आणि संपत्ती मिळवण्याचे मार्ग शोधायला मदत करतील.
टिप्पण्या