करोडपती कसं व्हायचं?

------------------------------------------------------------------------------------------------- 
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – करोडपती बनवणार्‍या सात पायर्‍या! 
------------------------------------------------------------------------------------------------- 
 
अमेरीकेत ग्रॅन्ट कार्डोन नावाचे एक गर्भश्रीमंत गृहस्थ आहेत, 
त्यांची संपत्ती तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे, 
 हे गर्भश्रीमंत गृहस्थ व्यवसायाने गुंतवणुकदार आहेत. त्यांच्या समुहाच्या मालकीच्या अनेक कंपन्या आहेत.  
 
तर अशातच ह्या अतिश्रीमंत आणि अतियशस्वी व्यक्तीने एक जबरदस्त पुस्तक लिहले,  
पुस्तकाचे नाव, 
“द मिलेनियर बुकलेट, हाऊ टु गेट सुपररीच!” 
 
 ग्रॅन्ट कार्डोन ह्यांनी ह्या पुस्तकात श्रीमंतीकडे झेप घेण्याच्या काही महत्वाच्या युक्त्या सांगितल्या आहेत. 
त्याच आज तुमच्याशी शेअर करत आहे.  
==================

 
१) करोडपती बनण्याचा निर्णय घ्या. – 
 
- लेखक म्हणतो, बहुसंख्य लोकांच्या मनात वरवर श्रीमंत बनण्याची इच्छा असते खरी,  
 
- पण त्यांच्या मनाच्या एका कोपर्‍यात पैशाविषयी भीती, दडपण आणि तिरस्कारही दडलेला असतो. 
 
- “मी गरीब आहे,” “मी करोडपती होणे, ह्या जन्मात तरी शक्य आहे का?” हे समज आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये सर्वात मोठ्ठे अडथळे असतात. 
 
- मनातुन नुसतीच पैशाची इच्छा असणारे आणि व्यवहारात पैशांचा आणि पैशेवाल्यांचा द्वेष करणारे लोक कधी श्रीमंत बनु शकत नाहीत. 
 
- “पैसा माणसाला कधीही सुखी बनवु शकत नाही.” “पैसा वाईट असतो.” अशा घातक समजुती मनातुन उखडुन फेकुन देण्यासाठी नव्याने सज्ज व्हा. 
    
- ‘मला करोडपती व्हायचे आहे’, हा दृढ निर्धारच एक दिवस तुम्हाला करोडपती बनवेल.  
 
- करोडपती बनण्याची तीव्र इच्छा असणारे लोक मोजकेच आणि साहसी असतात, नाहीतर जगात सगळेच करोडपती झाले असते. 

२. करोडपती होण्याचं साधं गणित –  
 
- एक करोड हा फक्त एक आकडा आहे, त्याचा बाऊ करु नका, 
 
- त्यात एकदा एक आणि सहादा शुन्य असतं, इतकचं! 
 
- मोठा आकडा हा छोट्या छोट्या आकड्यांनीच तर बनलेला असतो. 
 
- लेखकाने ह्या प्रकरणामध्ये एकदम साधं तितकंच मजेशीर गणितच समजावलं आहे, जे समजुन घेतल्यावर करोडपती बनणं आवाक्यात असल्यासारखं वाटायला लागतं. 
 
- एक करोड कमवायचे मार्ग कोणकोणते आहेत? 
 
- दहा लाख रुपये नफा कमवुन देणारे दहा ग्राहक शोधा.  
 
- किंवा एक लाख कमवुन देणारे फक्त शंभर ग्राहक शोधा. 
 
- किंवा दहा हजार नफा मिळवुन देणार्‍या एक हजार लोकांना सेवा द्या. 
 
- एक हजार रुपये मिळतील अशी वस्तु बनवा आणि ती दहा हजार लोकांना विका.  
 
लेखक म्हणतो, आपल्या व्यवसायातला नफा आणि आपल्या ग्राहकांची संख्या निश्चित झाली, करोडपती बनण्याकडे वाटचाल ठामपणे होवु लागते.  
 

३. नफा वाढवण्याकडे लक्ष द्या. –  
 
- ज्याची जितकी कमाई जास्त, करोडपती होण्याची शक्यता अधिक! 
 
- कमाईचे नवेनवे मार्ग तुम्हाला सुचतात का?  
 
- तुम्ही एक पगारी नौकर असाल तर स्वतःची बुद्धीमत्ता आणि स्वतःचा अनुभव वापरुन नौकरी करुन उरलेल्या वेळात तुम्ही एक साईड बिजनेस केला पाहिजे.  
 
- स्वतःचा व्यवसाय उभा करणारा माणुस आपोआपच आत्मविश्वासु बनतो.  
 
- तुमच्याजवळ पॅशन असेल तर तुम्ही आपोआपच मेहनत करु लागता, पण त्याचे श्रम तुम्हाला तितकेशे जाणवत नाहीत.   
 
- नौकरी करत असतानाही तुम्ही कंपनीत एका यशस्वी बिजनेसमॅनसारखेच वावरले पाहिजे. 
 
- फक्त पगाराच्या अपेक्षेने आलेला दिवस ढकलणारे लोक सर्वसाधारण लोकांचचं आयुष्य जगतात.  


४. माझे पैसे कुणाकडे आहेत? 
 
- लेखक म्हणतो, तुम्हाला मासे पाहिजे असतील तर समुद्रकिनारी नाहीतर नदीकाठावरच जावे लागेल, वाळवंटात किंवा डोंगरावर नाही. 
 
- स्वतःला विचारा, माझे पैसे कुणाकडे आहेत? 
 
- ह्याचाच अर्थ तुमचा संभाव्य क्लायंट कुठे दडुन बसला आहे, त्याचा शोध घ्या. 
 
- जगात खुप सारी संपत्ती आहे. तुम्हाला मोजता येणार नाही इतकी संपत्ती आहे,  
 
- तुम्हाला त्यातील फक्त एक करोड रुपये हवे आहेत, तुलनेने ती अतिशय साधी रक्कम आहे.  
 
- तुम्हाला हवे असलेले एक करोड रुपये, सध्या तुमच्याकडे नाहीत, मग ते तुम्हाला कोणाकडुन मिळण्याची शक्यता आहे, याचा शोध घ्या. 
 
- ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पैशाची गरज नाही,  
 
- तर खुश होवुन पैसे देणार्‍या संतुष्ट ग्राहकांची गरज आहे.  
 
- मग पैसा मागेमागे आपोआपच येईल. 
 
५. पैसा कुजवु नका, रुजवा. –  
 
- आजही फक्त साडेचार टक्के भारतीय लोकं कशात ना कशात गुंतवणुक करतात, आणि निष्क्रिय कमाईचे स्त्रोत उभारुन मजेत जीवन जगतात, 
 
- बाकीचे मात्र आयुष्यभर भाकरीचा संघर्ष करत राहतात. 
 
-  शेतात घुसलेलं जास्तीचं पाणी जसं दुसर्‍याच्या शेतात वाहुन जातं, अगदी तसं खिशात खुळखुळणारा अगावचा पैसा आपला रस्ता शोधतो आणि बघता बघता नाहीसा होतो. 
 
- लेखक म्हणतो, फक्त सेव्हिंग करणं, पुरेसं नाही, गुंतवणुकी उभारण्यावर भर द्या, 
 
- जमिनी घ्या, प्रॉपर्ट्या घ्या, नफा कमवुन देणारे बिजनेस शोधा.  
 
- रिकामा बसलेला पैसा आज ना उद्या खर्च होईल हे नक्की! त्यामुळे त्याला कामाला जुंपा. 
 
- पैसा गुंतवुन हलकं होण्याचं अजुन एक महत्वाचं कारण लेखक सांगतो, पुरेसा पैसा जवळ नसला की आपोआपच प्रयत्नांची गती वाढते.  
 
- रिकामे खिसे आणि आव्हाने, माणसाला अधिकच्या मेहनतीसाठी प्रवृत्त करतात. 
 
- शिथीलपणा दुर होतो, आणि व्यक्ती अधिक क्रियाशील बनतो. 


६. उत्पन्नाचे अधिक मार्ग –  
 
- एका ठिकाणाहुन आलेल्या शंभर रुपयांपेक्षा शंभर ठिकाणाहुन आलेला प्रत्येकी एक रुपया खुप मोलाचा आहे. 
 
- म्हणुनच श्रीमंत लोक एकाहुन अधिक कमाईचे मार्ग शोधुन काढतात.  
 
- पहीला उत्पन्नाचा मार्ग भक्कम करा, मग त्याच ज्ञानाचा मार्ग वापरुन जोडधंदा सुरु करा.  
 
- म्हणजे कमी वेळात जास्त संपत्तीला आकर्षित करता येईल. 
 

७. संगत बदला. – 
 
- आळशी, अल्पसंतुष्ट आणि मत्सरी लोकांना कामसु माणसं दिसली की त्यांचा न्युनगंड जागा होतो, म्हणुन ते त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी खाली खेचायला बघतात, 
 
- श्रीमंत होण्याच्या मार्गामधले अडथळे असणारे नकारात्मक लोक जेव्हा जेव्हा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, त्यांना गुपचुप बाजुला सारा. 
 
- आणि दुप्पट जोमाने प्रयत्न सुरु करा. 
 
- आपल्या ध्येयाची मस्करी उडवणारे आणि आपल्याला टोमणे मारुन आपल्याला हैराण करणारे आपले खरे मित्र नसतातच! 
 
- “तु आता बदलला खुप राव!,” 
 
-  “तु आजकाल खुपच पैसा पैसा करायला लागलाय!.”  
 
- “आता तु पुर्वीसारखं आमच्यासोबत (वायफळ गप्पा मारत) बसत नाही.” 
 
- अशा वातावरणात राहील्याने तुमची आर्थिक प्रगती होईल का, एकदा स्वतःला नक्की विचारा आणि मग निर्णय घ्या. 
 
- नेहमी आपल्याला प्रोत्साहन देणार्‍या लोकांच्या सहवासात रहा! 
 
लेखक म्हणतो, वरील कृती तुम्ही न थकता करत रहाल, एक ना एक दिवशी तुम्ही नक्की करोडपती बनाल. 
 
शुभेच्छा आणि आभार!

टिप्पण्या