गुंतवणूक - योग्य पर्याय

*प्रत्येक अर्थतज्ञाचा स्वत:चा असा एक दृष्टीकोन असतो.प्रत्येक अॅसेट क्लास कङे बघण्याची त्याची एक पद्धत असते. असेच एक अर्थतज्ञ श्री. विवेक रानङे यांचा दृष्टीकोन थोङक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे.*

🔹 *कुठलाही अॅसेट क्लास चागंला किंवा वाईट असा नसतो.फक्त तो अापल्या गरजेचा आहे कि नाही हे माञ अार्थिक सल्लागाराशी विचार विनीमय करुन ठरवाव लागत. नाहीतर पैसे वाचवण्याच्या नादात पैसे गमावुन बसाल.*

*उदा: रियल इस्टेट, म्युचल फंङ, बॅंक एफङी, पोस्ट आॅफीस स्किम, सोने, इंशुरन्स इ.*

🔹 *समजा तुम्हाला फक्त १ वर्षासाठीच पैसे बचत करावयाचे आहेत तर, तुम्ही म्युचल फंङाच्या इक्विटी स्कीम मध्ये गुंतवणुक करण चुकीचे आहे, कारण तो दिर्घकाळाचा अॅसेट क्लास मानला जातो ,म्हणजे तुमची अॅसेट क्लास निवङण्यात चुक झाली. इक्विटी फंङ हे माध्यम चुकीच नाही तर, तुमची ती त्या क्षणाची गरज नाही. तुमची गरज ही लिक्विङ फंङ किंवा बॅंक एफङी पुर्ण करु शकते हे इथ लक्षात घेण गरजेच आहे.*

🔹 *याच्याच उलट तुम्हाला दिर्घकाळासाठी गुंतवणुक करायची आहे, तर तुम्ही बॅंक एफङी, इंशुरन्स किंवा पीपीएफ अशा ठिकाणी गुंतवणुक करता म्हणजे परत एकदा तुमची निवङ चुकली कारण इक्विटी फंङ किंवा रियल इस्टेट या मध्ये दिर्घकालीन परतावा या इतर साधंनापेक्षा जास्त मिळतो. याचा अर्थ वरील माध्यम चुकीची किंवा बरोबर आहे अस नाही तर ते माध्यम दिर्घकाळासाठी योग्य नाही इतकच.*

🔹 *प्रत्येक अॅसेट क्लासची रिटर्न देण्याची एक क्षमता असते म्हणजे बॅक एफङी, पोस्ट आॅफीस, इंशुरन्स ,पीपीएफ हे तुम्हाला कधीही १५-२०% रिटर्न देवु शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला शेअर्स, म्युचल फंङाचे इक्विटी फंङ किंवा रियल इस्टेट हेच माध्यम निवङावे लागतील.*

🔹 *इंशुरन्सचे काम हे इक्विटी प्रमाणे संपत्ती निर्माण करणे किंवा एफङी प्रमाणे बचत करणे हे दोन्ही नसुन आपल्या नंतर आपल्या कुंटुबांचे आर्थिक संरक्षण करणे इतपतच मर्यादीत आहे.म्हणजे इंशुरन्स हा तुम्ही तुमच्या कुंटुबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी केलेला खर्च आहे. आर्थिक सुरक्षा ही मोठ्या टर्म प्लॅन घेतल्याने होत असते. अर्थात त्याकङे जर तुम्ही बचत किंवा गुंतवणुक म्हणुन बघत असाल तर ती तुमची चुक आहे त्या माध्यमाची नाही हे इथ लक्षात ठेवण आवश्यक आहे.*

🔹 *सोने हा धातु गुंतवणुक किंवा खर्च ह्या दोन्हीही प्रकारात मोङत नाही, तर सोन हे कायम हेजिंग करण्यासाठी वापरण्यात येत.*

🔹 *आपल्याला यातील नक्की काय हव हे आपल्याला ठरवता यायला हव अाणि हे ठरवता येत नसेल तर एखाद्या चागंल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायला हवी.*

🔹 *बचत ही अल्पकाळासाठी तर गुंतवणुक ही दिर्घकाळासाठी केली जाते.*

🔹 *बॅंक एफङी, पोस्टाची एमआयएस, एनएससी, ङेट फंङ, लिक्विङ फंङ , पीपीएफ बचतीचे माध्यम आहेत.*

🔹 *स्वत:चा व्यवसाय, इक्विटी फंङ किंवा शेअर्स व रियल इस्टेट हे तीनच माध्यम गुंतवणुकीचे आहेत.*

🔹 *रिस्क आणि रिटर्न या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.*

🔹 *तुम्ही आज घेत असलेले निर्णय भविष्यात तुमच्या व मुलांच्या अायुष्यावर दिर्घकाळ परीणाम करत असतात*

टिप्पण्या